ऋतु मन सुखावणा-या शेवंतीचा ।आला
पांढरे पिवळे लाल ताटवे शेवंतीचे
पाहतांना नज़र कशी विस्मित होते ।।१!!
निसर्ग कसा मानवाला भरभरुन देतो
ऋतु कोणताही येवो त्याला खुषच करतो
प्रकार किती दाखवावे त्यानी शेवंतीचे
जणू प्रदर्शनच भरविले आपल्या खजिन्याचे ।।२!!
भरीव गोल सुवासिक शेवंती पांढरी शुभ्र
बहरते एवढी की होते अति नम्र
पिवळ्या रोपाचाही तोरा फारच छान
पांढ-या पेक्षा त्याला कमी नाही मान ।।३!!
लाल गुलाबी शेवंती जेंव्हा बहरते
मन कसे त्यांच्या रंगाने हरखून जाते
वाटेपांढरी पिवळी शेवंती तर बागेत असावी
लाल गुलाबीनी पण बाग़ बहुरुन यावी ।।४!!
फुल मोठे डौलदार राणी शेवंतीचे
पांढ-या पिवळ्या कसे छान लाल रंगाचे
यांच्या सोबतीला बटन शेवंतीही शोभते
मग अश्या बागेला गालबोट लावावेसे वाटते।। ५!!माधुरी!!

No comments:
Post a Comment