Monday, 15 September 2014

तगरी

तगरी
तगर चांदणी सदाफुली अनंत तगरी नावें अनेक
बारामासी सदाबहार म्हणूनही जाणती किती एक
बगिच्यात तगरीचे झाड़ हिरवेगार डवरलेले दिसते
छत्रीसारखे गोल पांढ-या फुलांनी बहरलेले असते!!!!

टवटवीत पांढ-या शुभ्र फुलांचे भरीव हार दिसती छान 
चार फुले ओवून थोड्या अंतराने घालायचे ते हिरवे पान 
शुभ्र फुलांत मग गुलाबाची सुंदर फुले चार चांद लावती
हाराच्या मध्यभागी गुलाब तगरी चे गुच्छ शोभून दिसती !!!!

फुलांच्या पाकळ्या एकाच दिशेने वळलेल्या दिसतात
कळ्याही कश्या मोग-या सारख्या टपो-या असतात
ह्या कळ्यांचेही गजरे बनवून बाजारात विकले जातात 
सुगंध नसतो ह्यात पण दीर्घकाल ताज़े तवाने राहतात!!!!

पानाफुलांनी डवरलेली धनवान समाधानी साधी तगरी
आपल्या फुलापानांचे औषध बनवून उपयोगी होते परोपरी
किती तरी रोगावर उपयोगी काढ़ा हिच्या पाना फुलांचा
गुणांची खाण अशी ही तगर मान आमच्या बगिच्याचा !!!!

फुलांनी बहरलेले एकच झाड़ बगिच्याला शोभा आणते
दुस-या सुगंधित झाडाबरोबरही ताठ मानेने ते उभे असते
कुठल्याही निसर्गाच्या निर्मितीला  कधीही कमी लेखू नये
हज़ार हातानी तो देतो घेतां आपण कधीही  थकू नये!!!!

No comments:

Post a Comment