बोगनवेल-
गच्चीवरची बोगनवेल छान चौफेर बहरली
पाहून गुलाबी फुलं मनाची वृत्ति टवटवली।।
उन्हातही खुलते टिकते फुल बोगनवेलीचे
हसत राहतें वेलीवर मनं खुलविते सर्वांचे ।।१।।
फांदोफांदी फुलली पानोपानी बहरली
डौलदार काया चारी दिशेला लहरली।।
पराग पांढरे फुलांना चार चाँद लावती
पानोपानी फुलं फांदीवर झळकती।।२।।
लाल गुलाबी पांढरी पिवळ्या रंगांची
बोगनवेल खुलविते शान तुमच्या घराची।।
रस्त्याच्या कडेला किती सुंदर दिसते
शहराची शोभा ह्या बोगनवेलीनीच येते ।।३।।
सूर्याबरोबर राहण्यानी हिला तरतरी येते
थंडीत मात्र हिला ऊबेची गरज भासते।।
जास्त ओलावा वेल सहन करीत नाही
कोरड्या माती सह सारे जग पाही।।४।।
बोगनवेल लाडकी आहे सा-या जगाची
हिच्या असण्यानी शोभा वाढते जागेची।।
अश्या बोगनवेलीला प्रेमाने जोपासावे
तिच्या फुलण्यावर मन आपले गुंतवावे।।५।।

No comments:
Post a Comment